एन.के.पी.साळवे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी.साळवे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दपकाळामुळे दिल्लीत निधन झालं.

Updated: Apr 1, 2012, 10:23 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी.साळवे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृध्दपकाळामुळे दिल्लीत निधन झालं. उद्या त्यांच्या पार्थिवावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एन.के.पी.साळवे हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष होते.

एन.के.पी.साळवे नवव्या अर्थ आयोगाचे १९८९-९५ या कालावधीत अध्यक्ष होते. तसेच त्यांनी १९८२ ते १९८५ दरम्यान बीसीसीआयचे अध्यपद भूषविलं होते.

 

एन.के.पी.साळवे यांचा जन्म १८ मार्च १९२१ साली झाला. साळवे १९६७ ते १९७७ या काळात लोकसभा सदस्य होते. तर १९७८ ते १९९६ या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या राज्यमंत्रीपद तसंच स्टील आणि खाण, संसदीय कामकाज आणि उर्जा खात्याचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवलं.