ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची अमेरिकन विमानतळावर झडती घेतल्या प्रकरणी अमेरिकन ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेशनच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा राज्यसभेला दिली.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हारर्वड विद्यापीठात लेक्चर देऊन परतत असताना न्यु यॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती.
वॉशिंगटनमधल्या भारतीय दुतावासात झालेल्या बैठकीत वरिष्ठ टीएसए अधिकाऱ्यांनी अब्दुल कलाम यांच्या झडती प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती दिल्याचं एस.एम.कृष्णा यांनी सांगितलं.
टीएसएचे प्रमुख जॉन एस.पिस्टोल यांनी कलाम यांना २० ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली होती. तसेच टीएसएच्या कर्मचाऱ्यांनी अति महत्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत योग्य त्या पध्दतींचे पालन न केल्याची कबुलीही दिली होती.अमेरिकन दुतावासाने देखील कलाम यांची या प्रकरणा बद्दल माफी मागितली होती.