कोकाकोला-पेप्सीत कोलावॉर भडकण्याची चिन्हं

कोकाकोला आणि पेप्सीमध्ये पुन्हा एकदा कोला वॉर भडकण्याची चिन्हं आहेत. कोकाकोलाने उन्हाळ्याच्या मोसमाच्या तोंडावर २०० मिलीलिटर बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकाकोला २०० मिलीलिटरची बाटलीची किंमतीत एक ते दोन रुपयांची कपात करत देशभरात सर्वत्र आठ रुपयांनाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Updated: Feb 15, 2012, 04:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

कोकाकोला आणि पेप्सीमध्ये पुन्हा एकदा कोला वॉर भडकण्याची चिन्हं आहेत. कोकाकोलाने उन्हाळ्याच्या मोसमाच्या तोंडावर २०० मिलीलिटर बाटलीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकाकोला २०० मिलीलिटरची बाटलीची किंमतीत एक ते दोन रुपयांची कपात करत देशभरात सर्वत्र आठ रुपयांनाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कोकाकोलाची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली पेप्सिकोही २०० मिलीलिटर बाटलीच्या किंमतीत कपात करत प्रत्युत्तर देईल अशी चिन्हं आहेत. देशातील निमशहरी आणि ग्रामीण भागात २०० मिलीलिटर बाटलीचा खप सर्वाधिक आहे आणि या बाजारपेठा किंमतीच्या बाबतीत संवेदनशील म्हणून ओखळल्या जातात.

याआधी २००३ साली कोकाकोलाने किंमतींमध्ये कपात करत पाच रुपयांना २०० मिलीलिटरची बाटली उपलब्ध करुन दिली होती. त्यावेळेस पेप्सीनेही कोकाकोलाच्या पाठोपाठ किंमत कमी केली होती पण त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला होता. कोकाकोलाला थम्सअप आणि पेप्सी इतका खप गाठता आला नाही त्यामुळे जाहिरात, विपणन आणि किंमतीतील घट यामुळे खप वाढवण्याची रणनिती कंपनीने आखली आहे.