कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान दोषी- भाजप

कोळसा खाणसंबंधी कॅगनं नोंदवलेल्या आक्षेपांवरुन भाजपनं सरकारला कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराला थेट पंतप्रधान जबाबदार आहेत. त्यामुळं त्यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी भाजपनं केली आहे.

Updated: Mar 22, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

कोळसा खाणसंबंधी कॅगनं नोंदवलेल्या आक्षेपांवरुन भाजपनं सरकारला कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराला थेट पंतप्रधान जबाबदार आहेत. त्यामुळं त्यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी भाजपनं केली आहे.

२ जी स्पेक्ट्रम घोटाळापेक्षा हा मोठा घोटाळा आहे. न्यायालयाच्या देखरेखीवरुन या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. प्रश्नोत्तराचा तास रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली.

आता पर्यंतचा देशातला सर्वात मोठा घोटाळा कॅगच्या अहवालातून समोर आला आहे. सरकारच्या कोळसा खाणींबाबत चुकीच्या धोरणांमुळं देशाचं १० लाख ६७ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगनं सरकारवर ठेवला आहे.