केंद्राचे 10.67 हजार कोटींचे नुकसान

कॅगच्या अहवालात देशातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कोळसा खाणींचा लिलाव न केल्यानं सरकारचे १० लाख ६७ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Updated: Mar 22, 2012, 03:51 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

कॅगच्या अहवालात देशातला सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. कोळसा खाणींचा लिलाव न केल्यानं सरकारचे १० लाख ६७ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज  वर्तविण्यात आला आहे.

 

 

2 जी पाठोपाठ आणखी एका घोटाळ्यानं देश हादरलाय. आता पर्यंतचा देशातला सर्वात मोठा घोटाळा कॅगच्या अहवालातून समोर आला आहे. सरकारच्या कोळसा खाणींबाबत चुकीच्या धोरणांमुळं देशाचं १० लाख ६७ हजार कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगनं सरकारवर ठेवला आहे. कॅगचा हा अहवाल आपल्याकडे अपलब्ध असल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केला आहे.

 

 

२००४ ते २००९ दरम्यान सरकारनं लिलाव न करताच तब्बल १५५कोळशाच्या खाणी खिरापत म्हणून १००कंपन्यांना वाटल्या. विशेष म्हणजे चांगल्या प्रतीचा कोळसा मातीमोल किमतीत विकण्यात आला. त्यामुळं सरकारला आता पर्यंतचं सर्वात मोठं नुकसान सहन कराव लागल्य़ाचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रातील सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.