भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची पक्षश्रेष्ठींकडून दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आलीय. मात्र, या निवडीवर भाजपमधलं एक मोठं असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मात्र नाराज आहेत.
उघडपणे मोदींनी आपली नाराजी व्यक्त केली नसली तरी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईमध्ये २४ आणि २५ मे रोजी भाजप कार्यकारिणी बैठक आयोजिक करण्यात आलीय. नरेंद्र मोदी दिल्लीत झालेल्या या आधीच्या बैठकीलाही गैरहजर राहिले होते. तसंच विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशात मोहिम सुरु करण्याची गडकरींची विनंतीही मोदींनी उडवून लावली होती. संजय जोशी यांची कार्यकारणीत निवड झाल्याबद्दलही मोदी नाराज आहेत.
मुंबईमध्ये होणाऱ्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी विविध राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्यासह पक्षाचे जवळजवळ ५०० सदस्य उपस्थित राहणार आहेत.