तिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...

गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.

Updated: Nov 18, 2011, 03:50 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली. येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सर्रास दूर्लक्ष करणाऱ्या सरकारला बुडित खात्यात जाणाऱ्या किंगफिशर एअरलाईनच्या मागणीवर मात्र सरकारने तातडीने कारवाई सुरू केलीय. विमानसेवा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक करण्याच्या मागणीला नागरी उड्डाण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.  या खात्याचे सचिव नझीम झैदी यांनींच ही माहिती दिलीय. त्यामुळे येत्या काही आठवड्यात 24 टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.