झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात महागाईचे फटाके फुटत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील महागाईने उच्चांक गाठला आहे.
फळे, भाजीपाल्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाऊ लागल्या आहेत. महागाईचा दर 10.60 टक्के झाला आहे. ठोक भाव निर्देशांकानुसार गेल्या आठवड्यातील महागाईचा दर 9.32 टक्के होता. त्यापूर्वी एप्रिलमध्ये महागाई निर्देशांकाने 11.25 टक्के इतकी झेप घेतली होती.
महागाईच्या झळा बॅंकांच्या व्याजदरापर्यंत भिडण्याची शक्याता आहे. येत्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंक व्याजदरांचा फेरआढावा घेणार आहे. महागाई निदर्शेकांत होणारी वाढ धोक्याचा इशारा देणारी बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महागाईची काळजी वाटत असल्याचे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते सांगतात, क्रीसील'चे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. चांगला मान्सून आणि चांगल्या सुगीनंतरही महागाई आटोक्यात येत नसेल, तर अन्नधान्याचे भाव नीट नियंत्रित होत नाहीत, हे दिसते, असे त्यांनी म्हटले आहे.