मोदींच्या शालीने ओढवला वाद

आज वडोदरा येथील नवसारीला चालू असणाऱ्यासद्भावना उपवासाच्या दरम्यान मुस्लिम समाजाने दिलेली शाल अंगावर घेण्यास नकार दिला. या सद्भावना उपवासाच्या वेळी एका मुस्लिम व्यक्तीने मोदींना भेट म्हणून शाल देऊ केली. पण, शाल स्वीकारण्यास नकार दिला.

Updated: Oct 20, 2011, 01:16 PM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद


गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला जन्म दिला आहे.  मिशन सद्भावनेला टोपी प्रकरणाने वेगळेच वळण दिले होते. तर आता शाल ओढण्यास दिलेल्या नकारामुळे वाद निर्माण झाला.

 

आज वडोदरा येथील नवसारीला चालू असणाऱ्यासद्भावना उपवासाच्या दरम्यान मुस्लिम समाजाने दिलेली शाल अंगावर घेण्यास नकार दिला. या सद्भावना उपवासाच्या वेळी एका मुस्लिम व्यक्तीने मोदींना भेट म्हणून शाल देऊ केली.

गेल्या वेळेप्रमाणेच मोदींनी त्याचं अभिनंदन तर स्वीकारलं, पण, शाल स्वीकारण्यास नकार दिला. या आधी एकदा टोपी घालण्यास मोदींनी दिलेल्या नकारामुळे मोदींवर अनेक मुस्लिम संघटनांनी टीका केली होती.  तरीही, यावेळी मोदींनी शाल स्वीकारली नाहीच.