धुक्यामुळे दिल्लीत विमानसेवा विस्कळीत

दिल्ली शहरात पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे ३० विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला तर तीन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Updated: Jan 18, 2012, 01:07 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

दिल्ली  शहरात पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे ३० विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला  तर तीन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

दिल्लीसह उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांना धुक्यांना लपटले होते. दिल्लीत आज सकाळी ६ डिग्री सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. जम्मू काश्मिरमधील बर्फवृष्टीमुळे थंडीचा कहर असल्याचे, हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी विमानतळावर दाट धुके होते. १०० मीटर अंतरावरील काही दिसत नव्हते. विमानाचे उड्डाण होण्यासाठी किमान १५० मीटर अंतरावरील काही दिसणे आवश्यक आहे. पहाटे चार आणि पाच वाजता उड्डाण होणाऱ्या जेट एअरवेजच्या दोन विमानांचे उड्डाण दुसऱ्या मार्गाने करण्यात आले.