पश्चिम बंगालमध्ये विषारी दारु प्यायल्याने २० जण मृत्युमुखी

पश्चिम बंगाल राज्याच्या मागे बहुधा शुक्लकाष्ठ लागलं असं दिसतंय. आधी सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणमुळे नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले मृत्यु नंतर खाजगी हॉस्पिटलला लागेल्या आगीत जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता विषारी दारु प्यायाल्याने ३० लोकांचा मृत्यू ओढावला आहे

Updated: Dec 14, 2011, 02:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, कोलकाता

 

पश्चिम बंगाल राज्याच्या मागे बहुधा शुक्लकाष्ठ लागलं असं दिसतंय. आधी सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणमुळे नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले मृत्यु नंतर खाजगी हॉस्पिटलला लागेल्या आगीत जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता विषारी दारु प्यायाल्याने ३० लोकांचा मृत्यू ओढावला आहे. पश्चिम बंगालमधल्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील मोग्राहाट इथे ३० लोकांचा विषारी दारु प्राशन केल्याने मृत्यु झाला आहे तर १३५ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

 

यापैकी काही लोक अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस अधिक्षक लक्ष्मी नारायण म्हणे की डायमंड हार्बर आणि संग्रामपूर इथल्या रुग्णालयांमध्ये एकशे वासी लोकांना दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांची प्रकृती चिंताजनक असून ते पोटदुखी, उलट्या आणि हगवणीने त्रस्त आहेत. संग्रामपूर गावातील दहा गावकरी पहाटेच्या सुमारास मृत्युमुखी पडले तर इतर दहा जण रुग्णालयात दाखल केल्यानंतर मरण पावले.