www.24taas.com, मुंबई
सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.
यापूर्वी पेट्रोलच्या किंमतीमध्ये किरकोळ एक दोन रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, यूपीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी भारताच्या जनतेला भेट देत त्यांचे कंबरडे मोडले आहे. यापूर्वी मुंबईत नोव्हेंबर २०१०चा विचार करता पेट्रोल ५७ रुपये ३५ पैसे होते. ते आता १८ महिन्यात ७८ रुपये १६ पैशांवर गेले आहे.
युपीए सरकारने तीन वर्षापूर्वी घेतलेल्या शपथीच्या वेळी पेट्रोलच्या किंमती ४० रुपयांच्या आसपास होती. आता जवळपास दुप्पट किंमत झाली असून ही किमंत ७८.१६ झाली आहे.
महागाईच्या वणव्यात सामान्य जनता आणखी भरडली जाणार आहे. २२ मे रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा भडका उडण्याची चिन्हे होती. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमती आणि पैशाच्या तुलनेत डॉलरची वाढलेली किंमत यामुळे पेट्रोलची दरवाढ अटळ होती. ती आज करण्यात आली.
२२ मे नंतर पेट्रोलमध्ये ५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलमध्ये ३ रुपये प्रति लिटर अशी वाढ अपेक्षित होती. परंतू आज झालेली वाढ अपेक्षेपेक्षा २.५० पैशांनी अधिक आहे.
मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे
Mumbai Petrol Price = 70.66 Rs/Ltr Most Recent price change date: Sunday, April 01, 2012 |
Mumbai Petrol Price = 70.65 Rs/Ltr Historical Petrol price change date: Thursday, December 01, 2011 |
Mumbai Petrol Price = 71.47 Rs/Ltr Historical Petrol price change date: Wednesday, November 16, 2011 |
Mumbai Petrol Price = 73.81 Rs/Ltr Historical Petrol price change date: Friday, November 04, 2011 |
Mumbai Petrol Price = 71.92 Rs/Ltr Historical Petrol price change date: Friday, September 16, 2011 |
Mumbai Petrol Price = 68.62 Rs/Ltr Historical Petrol price change date: Friday, July 01, 2011 |
Mumbai Petrol Price = 68.33 Rs/Ltr Historical Petrol price change date: Sunday, May 15, 2011 |
Mumbai Petrol Price = 63.08 Ltr Historical Petrol price change date: Sunday, January 16, 2011 |
Mumbai Petrol Price = 60.46 Ltr Historical Petrol price change date: Thursday, December 16, 2010 |
Mumbai Petrol Price = 57.35 Ltr Historical Petrol price change date: Tuesday, November 09, 2010 |
पुणे आता झालेला पेट्रोलचा दर ७८ रुपये ४८ पैसे
Pune Petrol Price = 70.98 Rs/Ltr Most Recent price change date: Thursday, December 01, 2011 |
Pune Petrol Price = 71.76 Rs/Ltr Historical Petrol price change date: Wednesday, November 16, 2011 |
Pune Petrol Price = 74.06 Rs/Ltr Historical Petrol price change date: Friday, November 04, 2011 |
Pune Petrol Price = 72.24 Rs/Ltr Historical Petrol price change date: Friday, September 16, 2011 |
Pune Petrol Price = 68.18 Rs/Ltr Historical Petrol price change date: Sunday, May 15, |