www.24taas.com, मथुरा
बाबा जयगुरूदेव यांना मुखाग्नि देणाऱ्या पंकज यादव या वाहनचालकास १२ हजार कोटी रुपये संपत्ती असलेल्या ट्रस्टचा विश्वस्त नेमलं आहे. पंकजला आपला उत्तराधिकारी बनवण्याचा निर्णय स्वतः बाबा जयगुरूदेव यांनी आधीच घेतला होता.
बाबांचे भक्त फूल सिंग यांनी एक पत्र वाचून यासंदर्भात माहिती दिली. हे पत्र स्वतः बाबांनी लिहिलं होतं. या पत्रानुसार २० जुलै २०१० रोजी बाबांनी इटावाच्या सिव्हिल कोर्टात आपल्या नंतर पंकजला आपल्या संपत्तीचा वारस बनवावं, असं लिखित स्वरुपात दिलं होतं. यापूर्वी मंदिराचे ट्रस्टी के. बी. चौधरी म्हणाले होते की, '२००७ मध्ये बाबा जयगुरूदेव यांनी एका सत्संगात उमाकांत तिवारी यांना वारस घोषित केलं होतं. मात्र काही लोकांचा या गोष्टीला विरोध होता.'
फूल सिंग ज्या पत्राद्वारे पंकजला उत्तराधिकारी बनवत आहेत, त्या पत्राबद्दल अजूनही संभ्रम आहे. ट्रस्टच्या प्रबंध समितीचा हा सर्वानुमते मान्य झालेला निर्णय नसल्यामुळे पंकजला उत्तराधिकारी बनण्यास अडचण येऊ शकते.