बेळगाव बंदला हिंसक वळण

बेळगाव बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर कोल्हापूर - बेळगाव या मार्गावर बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Updated: Nov 4, 2011, 07:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, बेळगाव 

 

बेळगाव बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर कोल्हापूर - बेळगाव या मार्गावरील राज्य परिवहन मंडळाच्या बसची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय.

 

महापौर आणि उपमहापौरांच्या केबीनवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ मराठी संघटनांनी आज बेळगाव बंद पुकारलाय. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी युवा मंच यांनी हा बंद पुकारलाय.

 

निषेध नोंदवण्यासाठी मराठी संघटनांनी रॅली आयोजित केली होती. मात्र हा बंद मोडून काढण्यासाठी कर्नाटक सरकारनं दडपशाही सुरू केलीय. या रॅलीत सहभागी झालेल्यांचं अटकसत्र पोलिसांनी सुरू केलंय. तर दुसरीकडे बेळगाव बंदचे कोल्हापुरातही पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं कोल्हापूर शहरबंदची हाक दिलीय.