टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील माझे निर्दोषत्व मी सिध्द करीन, असे उद् गार आरोपी असलेली द्रमुक खासदार कणिमोळी हिने काढले.
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आरोपी असलेली द्रमुक खासदार कणिमोळी तब्बल सहा महिन्यांनंतर चेन्नईत परतली. कणिमोळीचे चेन्नईत जोरदार स्वागत झाले. द्रमुक अध्यक्ष आणि कणिमोळीचे वडील एम. करुणानिधी आणि त्यांच्या समर्थकांनी विमानतळावरच कणिमोळीचे स्वागत केले. त्यानंतर वडिलांसह कणिमोळी घरी पोहोचली. तिथे पती आणि मुलांसह सर्व कुटुंबियांनी कणिमोळीचे स्वागत केले.
स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर कणिमोळीची रवानगी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये झाली होती. तब्बल सहा महिन्यानंतर तिला २९ नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला होता.