रुपयाच्या चिन्हासह शंभराच्या नोटा लवकरच

रिझर्व्ह बँक लवकरच रुपयाचं नवे चिन्ह असलेल्या १०० रुपयांच्या नोटा जारी करेल. सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधी २००५ सिरीज सारख्याच नव्या नोटा असतील फक्त त्यावर रुपयाचे नवं चिन्हं असेल.

Updated: Jan 18, 2012, 10:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रिझर्व्ह बँक लवकरच रुपयाचं नवे चिन्ह असलेल्या १०० रुपयांच्या नोटा जारी करेल. सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधी २००५ सिरीज सारख्याच नव्या नोटा असतील फक्त त्यावर रुपयाचे नवं चिन्हं असेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की १०० रुपयांच्या नोटांच्या गर्व्हनर डी.सुब्बाराव यांची स्वाक्षरी असलेल्या महात्मा गांधी २००५ सिरीजच्या आणि पाठीमागच्या बाजुस छापण्यात आलेल्या वर्षाचा उल्लेख असेल.

 

भारतीय रुपयाला अनोखं चिन्हं प्राप्त झालं. नव्या चिन्हात देवनागरी लिपीतील ‘रा’ आणि रोमन लिपीतील ‘आर’ असा मिलाफ दिसून येतो. अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पाऊंड आणि जपानी येन यांच्या प्रमाणेच रुपयाला एक वेगळी ओळख मिळाली.

 

मुंबई आयआयटीचा द्विपदवीधर असलेल्या डी.उदय कुमार याने तयार केलेलं नवं चिन्ह जुलै २०१० मध्ये स्वीकारण्यात आले.