कपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…' रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली?

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : कपूरची लेक मोदींची सून होणार आहे. कारण श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत फोटो शेअर त्यावर रोमँटिक गाणं लावून प्रेमाची कबुली दिलीय, अशी चर्चा रंगलीय.  

नेहा चौधरी | Updated: Jun 19, 2024, 12:00 PM IST
कपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…'  रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली? title=

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : बॉलिवूड अभिनेत्री आणि शक्ती कपूरची लाडली श्रद्धा कपूरने तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर राहुल मोदीसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने रोमँटिक गाणंही लावलं. विशेष म्हणजे राहुलने तिची झोप उडवलीय, असं त्यात लिहिलंय. म्हणून श्रद्धाने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे, अशी चर्चा रंगली आहे. 

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या जामनगरीमधील प्री वेडिंगच्या वेळी श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र गेले होते. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी श्रद्धा सुट्ट्यांवर गेली होती आणि तेदेखील कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत. या दोघांचे एकत्र नाही पण काही फोटोंमधून त्यांचं हे गुपित उघड झालं होतं. 

श्रद्धा आणि राहुल गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण या दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे काही वक्तव्य केलं नाही. पण आज श्रद्धाने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली असंच म्हणायला हवं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha  (@shraddhakapoor)

काय आहे श्रद्धा कपूरची पोस्ट?

श्रद्धा कपूरने  आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे.  राहुल मोदीसोबत तिने आपला एक फोटो पोस्ट शेअर करत त्यावर कॅप्शन दिलंय की, माझं हृदय तू ठेव पण  माझी झोप मला दे यार...' असं तिने हिंदीमध्ये लिहिलंय. त्याशिवाय स्माईली आणि फनी इमोजीसह हार्ट इमोजी तिने ठेवल्या आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा अतिशय आनंदी दिसतंय. शिवाय तिने ही स्टोरी राहुलला टॅग केलीय.

श्रद्धा सध्या 'स्त्री 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाच्यावेळी श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली, असं मीडिया रिपोर्टनुसार म्हटलं जातं.