लैलाचा अंडरवर्ल्ड प्रवेश...

लैलाचे आणि दाऊदच्या डी कंपनीचे संबध होते याची कुणकुण पोलिसांना लागली होती आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लैला भारताबाहेर जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, त्यातच तिला अवैध मार्गानं मिळवलेली संपत्ती हीच तिचा काळ बनून आल्याची चर्चा आता सुरु झालीय.

Updated: Jul 5, 2012, 11:43 PM IST

www.24taas.com 

 

लैलाचे आणि दाऊदच्या डी कंपनीचे संबध होते याची कुणकुण पोलिसांना लागली होती आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लैला भारताबाहेर जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, त्यातच तिला अवैध मार्गानं मिळवलेली संपत्ती हीच तिचा काळ बनून आल्याची चर्चा आता सुरु झालीय. हवालानं मिळवलेला पैसा आणि डी कंपनीच्या नेटवर्कमधला वावर यामुळे लैलाभोवतीच्या प्रश्नांची मालिका वाढतच चाललीय.

 

बॉलीवूड अभिनेत्रीच्या मुखवट्या दडलेला हा डी कंपनीचा चेहरा - लैला खान. पोलिसांच्या म्हणण्यानुसार लैलाचे आणि दाऊदचे जवळचे संबध आहेत. ज्याची सुरुवात मुंबईतच झाली होती. लैला खान सुरुवातीच्या काळात बॉलीवुडमध्ये एण्ट्रीसाठी स्ट्रगल करायची. तेव्हा  ती अशा अनेक व्यक्तीच्या संपर्कात आली होती. जी अंडरवर्ल्डमध्ये हवालाचं काम करायचं. सुत्राच्या म्हणण्यानुसार  लैलानं  फिल्मी दुनियेबरोबरचं  अंडरवर्ल्डचा रस्ता पकडला होता. ती कमल यारमी नावाच्या एका माणसाच्या नेहमी संपर्कात आली होती. असं म्हटल जात की हा कमल अंडरवर्ल्डशी हवालाचं काम करायचा. म्हणजेच एका पार्टीकडून दुस-या पार्टीक़डे पैशाची देवाणघेवाण करायचा आणि यातूनच लैलाचे कमलच्या मुलाशी म्हणजेच सोनू यारमीशी संबध आले होते. आणि या संबधातून लैलानं  झेप घेतली होती, ती अंडरवर्ल्ड डॉन  दाऊद इब्राहीम कासकर यांच्यापर्यंत.

 

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, लैलानं दाऊदचा निकटवर्तीय आणि अंडरवर्ल्डमधील हवाला किंग कमल यारमीच्या मुलाबरोबरच म्हणजेच सोनू यारमीशी निकाह केला होता आणि त्याच्याबरोबरच ती दुबईत राहायची. लैला खान  केवळ डी कंपनीच्याच नाही तर लष्कर- ए- तय्यबाच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होती असल्याचा दावा पोलीस करत आहेत. लैलांच्या आणि संशयास्पद व्यक्तीच्या नेहमीच गाठीभेटी व्हायच्या असाही आरोप ठेवण्यात आला. लैलानं आपल्या अंडरवर्ल्ड कनेक्शचा वापर फिल्मी दुनियेत प्रसिद्धीसाठी केला होता. लैलाचे मुंबई कनेक्शनही आता समोर येतय. मुंबईच्या ओशिवरामधील लैलाच्या फ्लॅटमध्ये  डी कंपनीचे नेटवर्क सक्रीय होतं, अशीहीमाहिती समोर येतेय आणि याची खबर लैलाही मिळाली होती. म्हणूनच  लैलानं पोलिसांच्या ससेमि-यापासून वाचण्यासाठी भारताबाहेर पळण्याचा प्लॅन आखला होता आणि यासाठीच तीने प्लॅन आखला होता तो दिड दशकापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  कासकर याच्यासारखाच.