'सिमी'वर अजून २ वर्षं बंदी

‘सिमी’ या संघटनेवरील बंदी दोन वर्षांनी वाढवण्याच्या गृहमंत्रालयाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ‘स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या वादग्रस्त संघटनेवर आणखी दोन वर्षं बंदी कायम असणार आहे.

Updated: Jan 13, 2012, 05:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

‘सिमी’ या संघटनेवरील बंदी दोन वर्षांनी वाढवण्याच्या गृहमंत्रालयाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ‘स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या वादग्रस्त संघटनेवर आणखी दोन वर्षं बंदी कायम असणार आहे.

ही बंदी वाढवण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचं सांगत कायदे मंत्रालयानं या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सिमीवर २००१ पासून बंदी असून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात संपत बंदी होती.

मात्र गृहमंत्रालयानं ही बंदी वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. शांत होणा-या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सिमीवर २००१ पासून गुप्तचर संघटनेची बारीक नजरही आहे