धनंजय मुंडेंना बैठकीचे निमंत्रण नाही

आज मुंबईत होणा-या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत धनंजय मुंडे याना डावलण्यात आलं आहे.. भाजप आमदार धनंजय मुंडे याना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय पातळीवर निर्णय होईल अशी सारवासारव करणारी प्रदेश कार्यकारणी आजच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.

Updated: Jan 8, 2012, 08:41 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आज मुंबईत होणा-या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत धनंजय मुंडे याना डावलण्यात आलं आहे.. भाजप आमदार धनंजय मुंडे याना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सुरुवातीला केंद्रीय पातळीवर निर्णय होईल अशी सारवासारव करणारी प्रदेश कार्यकारणी आजच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. धनंजय मुंडेना माघार घेण्यासाठी गोपीनाथ मुंडे, आणि नितीन गडकरी यासारख्या दिग्गजानी विनवणी केली होती. पण या सा-याना धुडकावून धनजंय मुंडेनी बंडाचा झेंडा रोवला होता..

 

परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचे अधिकृत उमेदवार जुगल किशोर लोहीया यांच्या विरोधात दिपक देशमुख या अपक्ष उमेदवाराला मदत करुन धनजंय मुंडे यानी भाजपला दणका दिला होता. यानंतर प्रदेश भाजप कार्यकारणी काय कारवाई करते याकडे सा-याचं लक्ष होत.