मुंडेंची काढणार पुतण्या विकेट

परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.

Updated: Dec 24, 2011, 02:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, परळी

 

परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.

 

 

२६ तारखेला नगराध्यक्षपदाची निवडणूक होतेय. यात गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनंजय यांनी दंड थोपटलेत. बहसंख्य नगरसेवक धनंजय यांच्या बाजूनं आहेत. त्यामुळं आता क्रिकेट खेळणारे हे नगरसेवक आपलेच नेते गोपीनाथ मुंडे यांची विकेट काढणार असं दिसतय.

 

 

परळीत भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून गोपीनाथ मुंडे गटाचे जुगलकिशोर लोहिया यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात ही घोषणा केलीये.. तर भाजपच्या नगरसेवकांनी लोहिया यांनाच पाठिंबा द्यावा यासाठी व्हिप काढण्यात आला आहे.

 

 

भाजपचे माजी आमदार केशवराव आंधळे यांना या संदर्भात सर्वाधिकार देण्यात आलेत.  मुंडे काका-पुतण्यातलं भांडण मिटवण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही अपयश आल्याने आता भाजप स्वतंत्र उमेदवार उभा कऱणार आहे. तर धनजंय मुंडेसुद्धा भाजपविरोधात आपला उमेदवार उभा करणार आहे.  भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी धनंजय यांची पुरेपुर समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

 

 

मात्र आपण २० वर्ष गोपीनाथ मुंडे यांचे ऐकत आलोय आता यावेळी आपल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी धनंजय यांनी भाजप नेत्यांकडं केली. याखेरीज दोघांच्याही उमेदवारांना अडीच-अडीच वर्षाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, पहिली टर्म आपल्यालाच पाहिजे, असा आग्रह गोपीनाथ मुंडे गटानं केला. तो धनंजय यांनी अमान्य केला.

 

यामुळं आता परळीच्या आखाड्यात गोपीनाथ मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे गट आमनेसामने असणारेत. त्यामुळं गोपीनाथ मुंडेंसाठी ही निडवणूक प्रतिष्ठेची होणार आहे. २६ तारखेला होणा-या या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या समर्थकाचं पारडं  काय करतयं याची उत्सुकता आहे.

 

[jwplayer mediaid="16814"]