मुंडे घराण्यात 'भाऊबंदकी'

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत.

Updated: Jan 16, 2012, 02:20 PM IST

www.24taas.com, बीड

 

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे.

 

पुतणे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु असताना, गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत. पंडितअण्णाच्या या राष्ट्रवादी प्रवेशाने बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या गडाला खिंडार पडलं आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पंडित अण्णा मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पंडितअण्णांसोबत भाजपचे १० नगरसेवक आणि ७ ते ८ जिल्हा परिषद सदस्यही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. जिल्हापरिषद निवडणुंकाच्या पार्श्वभुमीवर विरोधकांबरोबरच आता स्वकीयांचा सामना करण्याचा आव्हान गोपीनाथ मुंडेसमोर निर्माण झालं आहे.

 

[jwplayer mediaid="29922"]