www.24taas.com, मुंबई
शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.
प्रत्यक्षात विश्वस्त मंडळात 15 सदस्यांची नेमणूक करतांना मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायमूर्तींनी विश्वस्त मंडळाच्या निवडीला स्थगिती दिलीय. पुढील निर्णय होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिका-यांनी कारभार पाहावा, असे आदेश कोर्टानं दिले आहेत.
नव्या यादीत अकरा नव्या चेह-यांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आली आली. विश्वस्त मंडळात सात काँग्रेस तर सात राष्ट्रवादीचे सदस्य आणि शिर्डी नगर पंचायतीचा एक अध्यक्ष अशा पंधरा जणांचा समावेश आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांना संस्थानाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.जयंत ससाणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि शैलेश कुटे हे तिघंजण जुन्या विश्वस्त मंडळातही होते.
जुन्या विश्वस्त मंडळातील सदस्य आणि पदाधिका-यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा विश्वस्त मंडळात घेऊ नका अशा आशयाची एक याचिका हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. नवीन विश्वस्तमंडळ नेमताना सरकारनं या याचिकेचा विचार केलेला नाही हे विशेष.