www.24taas.com, खेड
मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक असणार आहे. कोकणाचं प्रवेशद्वार समजलं जाणाऱ्या कशेडी घाटातील धोकादायक दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. याचा त्रास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
गेल्यावर्षी ऐन गणपतीत दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पावसाळ्यापूर्वीच या घाटात कोसळणारी दरड रोखण्यासाठी आणि रस्त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणारं आहे .त्यामुळे २५, २६ आणि २७ एप्रिलपर्यंत कशेडी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
यादरम्यान कोकणाकडे जाणारी वाहूतक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. तीन दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून अवजड वाहनांसाठी खेड-म्हाप्रळमार्गे टोळ तर, आंबेत, मंडणगड, खेड, तर एसटी आणि हलक्या वाहनांसाठी राजेवाडी फाटा, विन्हेरेमार्गे नातूनगर असा मार्ग देण्यात आला आहे.