www.24taas.com, नवी मुंबई
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुढची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला एकत्रिक सामोरी जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी आघाडीत वाद झाले. मात्र त्याचा परिणाम आघाडीवर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवारांच्या या वक्तव्याने दोन्ही काँग्रेसमधले वाद टोकापर्यंत ताणले जाणार नाहीत हे स्पष्ट झालय.
नवी मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात नुकत्याच १५ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्यात. त्यानंतर सत्तेच्या समिकरणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या पक्ष्यांशी आघाड्या केल्या त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या.
या सर्वांचा परिणाम विधानसभा आणि लोकसभेतील आघाडीवर होणार नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सरचिटणीस पी. ए. संगमा यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पाठविण्यात आले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. संगमा यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पाठविण्याइतकी आमची ताकद नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
[jwplayer mediaid="87592"]