ट्रॅफिकचा ताण, तरुणाला मारहाण !

ट्राफिक जाम का झालाय या बाबत विचारपूस करणाऱ्या मोटर सायकल चालकाला दोन ट्राफिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. या घटनेबाबत विचारणा केल्यावर दोन्ही पोलिसांनी मात्र पळ काढला.

Updated: Dec 27, 2011, 09:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, कल्याण

 

ट्राफिक जाम का झालाय या बाबत विचारपूस करणाऱ्या मोटर सायकल चालकाला दोन ट्राफिक पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. या घटनेबाबत विचारणा केल्यावर दोन्ही पोलिसांनी मात्र पळ काढला. पोलिसांच्या या गुंडगिरीवर कारवाई करा अशी मागणी जखमींच्या नातेवाईकांनी केलीय

 

कल्याणच्या रेती बंदर परिसरात दुधाचा व्यवसाय करणारा नाझीर कुंगले हा २२ वर्षीय युवक मोटरसाययकलवरून दूध घेऊन जात असताना त्याला सहजानंद चौकात ट्राफिक जाम झालेला दिसला. म्हणून जवळच उभ्या असलेल्या शांताराम कसबे यांना ट्राफिक जाम बद्दल नाझीरने विचारणा केली मात्र पोलिसांनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुठलाही विचार न करता रागाच्या भरात मारहाण सुरु केली. एवढच नाही तर पोलिसांनी नाझीरला त्याचं डोक पकडून त्याच्या गाडीवर आपटलं. या आमनुष मारहाणीमुळे नाझीरच्या डोक्याला जबर मार लागला.

 

या घटनेबाबत ट्राफिक पोलिस शांताराम कसबे यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि संधी साधून पळ काढला. आत्तापर्यंत सर्वसामन्यांना वाहतूकीचा त्रास होत होता आता मात्र ट्राफिक पोलिसांच्या अरेरावीचा त्रास सहन करावा लागतोय.