ठाण्यात पाणी जातयं वाया....

गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक विचित्र चित्र पहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेकडून आधिच पाणी पुरवठ्याचे तिन तेरा वाजले आहेत.

Updated: Dec 16, 2011, 12:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक विचित्र चित्र पहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेकडून आधिच पाणी पुरवठ्याचे तिन तेरा वाजले आहेत. त्यातच प्रत्येक आठवड्याला पाईपलाईन फुटीच्या घटना घडत आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये २० वेळा अशा प्रकारे पाईपलाईन फूटीच्या घटना घडल्या आहेत.

 

त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. अशाप्रकारे पाणी वाया जात असल्यानं पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. पाणीपूरवठा अनियमीत असल्याचे जनतेचे आरोप चुकीचे असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. या सर्व प्रकारांना पालिका अधिकारी, सत्ताधारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

 

सततच्या पाईप फुटीच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य ठाणेकर नागरीक अत्यंत त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता या पाईप फूटीच्या घटनामुळे यात काही काळंबेरं तर नाही ना? अशी सर्वसामान्यांना शंका येत आहे.