www.24taas.com, नवी मुंबई
मुंबईत टॅक्सीचे किमान भाडे १६ रुपयांवरून १७ रुपये करून परिवहन खात्याने मुंबईकरांना भाडेवाढीचा झटका दिला असताना नवी मुंबईकरांना रिक्षाचा प्रवास दिलासादायक होणार आहे. नवी मुंबईत किमान रिक्षाचे भाडे आता ११ रूपये असणार आहे.
पूर्वी हे भाडे १५ रूपये होते. ११ रूपयांची अंमलबजावणी रविवारी दि. १८पासून मध्यरात्री होणार आहे. नवी मुंबईत सीएनजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांचे प्रमाण ८८ टक्के झाले आहे. त्यामुळे तेथील रिक्षांना पेट्रोल भाडेपत्रक रद्द करून सीएनजी दरपत्रक लागू करण्याचा निर्णय एमएमआरटीएच्या बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार नवी मुंबईत रिक्षा प्रवासासाठी १.६ किमीच्या पहिल्या टप्प्याला १५ रुपयांऐवजी ११ रुपये भाडे आकारले जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रती किलोमीटर साडेनऊ रुपयांऐवजी सात रुपये द्यावे लागतील. त्यामुळे दोन टप्प्यांच्या रिक्षा प्रवासासाठी तब्बल साडेसात रुपयांची बचत होईल.
नवी मुंबईत सीएनजी रिक्षा भाडे (जुना दर)
पहिला टप्पा (१.६ किमी) – आता ११ रुपये आणि पूर्वी १५ रूपये होता.
दुसरा टप्पा (प्रती किमी) – आता ७ रुपये आणि पूर्वी ९.५ रुपये होता.