बालकांची विक्री करणारी टोळी गजाआड

उल्हासनगरमध्ये नवजात मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. नवजात मुलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

Updated: Feb 24, 2012, 10:16 PM IST

चंद्रशेखर भुयार, www.24taas.com, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये नवजात मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. नवजात मुलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

विजया सोनावणे ही गरीब घरातल्या महिलांना पैशाचं आमिष दाखवून नवजात मुलं विकण्याचा अमानुष धंदा करायची. श्रीमंत ग्राहक हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि मुल विकायचं अशी या टोळीची कार्यपद्धती होती. एका सहा दिवसाच्या मुलाची सव्वा दोन लाखात विक्री करत असताना हिललाईन पोलिसांनी तिला अटक केली.

विजया सोनावणेसह रत्ना उबाळे आणि कनोजिया दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीनं या पद्धतीनं नवी मुंबई, अलिबाग आणि रायगडमध्ये या पद्धतीनं मुलांची विक्री केल्याचं तपासात समोर आलं आहे. तसंच परराज्यात विकल्या गेलेल्या मुलांच्या तपासासाठी तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत.