www.24taas.com, खालापूर
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात २३ जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. खालापूर जवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाड असलेल्या दोन मिनी बसना मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
या अपघातात २३ जण ठार झाले. मृतांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातात १५ जण जखमी झाले. सर्व जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
एका मिनी बसचे दिवे बंद झाले. त्यामुळे दुसऱ्या बसच्या मागोमाग हळू-हळू प्रवास सुरू असताना मागून वेगाने आलेल्या टेम्पोची धडक बसल्यामुळे अपघात झाला. नवविवाहीत दाम्पंत्य अपघातातून वाचले मात्र त्यांच्या १७ नातेवाईकांचा अपघातात मृत्यू झाला.