मुख्यमंत्र्यांमुळे मेट्रोचं काम 'स्लो ट्रॅकवर'

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यानं आणि निवडणूक आचारसंहितेमुळं नवी मुंबईच्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या भूमीपूजन रखडलं आहे. त्यामुळं मेट्रोचं काम स्लो ट्रॅकवर सुरु आहे.

Updated: May 3, 2012, 01:36 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

 

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यानं आणि निवडणूक आचारसंहितेमुळं नवी मुंबईच्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या भूमीपूजन रखडलं आहे. त्यामुळं मेट्रोचं काम स्लो ट्रॅकवर सुरु आहे. वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करत नवी मुंबई मेट्रो रेल्वेचं काम सुरु करण्यात आलं. तीन मजली अत्याधुनिक एसी स्टेशन आणि सरकते जिने ही मेट्रोची वैशिष्ट्य असणार आहे.

 

नवी मुंबईतल्या या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधर ह्या मार्गावर बांधकाम सुरु आहे. ११ किलोमीटरच्या या मार्गावरील ११ स्टेशनचं काम सध्या सुरु आहे. यातल्या पेठपाडा रेल्वे स्टेशनचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार होतं. मात्र मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्यानं आणि आचारसंहितेमुळं हा कार्यक्रम पुढं ढकलण्यात आला आहे. त्यामुळं मेट्रोचं काम स्लो ट्रॅकवर सुरु आहे.

 

कार्यक्रम पुढं ढकलला असला तरी काम सुरु असल्याचं सांगत वर्क ऑर्डर दिल्याचं सिडकोकडून सांगण्यात आलं आहे. भूमीपूजन लांबणीवर पडल्यानं काम धीम्या गतीनं सुरु आहे. त्यातच महिन्याभरावर पावसाळा सुरु होणार असल्यानं २०१४ च्या डेडलाईनमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल का याबाबत शंका उपस्थित करण्यात येते.