वाळूमाफिया नितीन परब फरार

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परब गेल्या दोन दिवसांपासून फरार आहे. परब याचा जामीनअर्ज माणगावच्या कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यानं शरण येणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता नितीन परब फरार झाला आहे.

Updated: Apr 4, 2012, 08:29 PM IST

www.24taas.com, अलिबाग

रायगड जिल्ह्यातल्या रोह्याचा वाळूमाफिया नितीन परब गेल्या दोन दिवसांपासून फरार आहे. परब याचा जामीनअर्ज माणगावच्या कोर्टानं फेटाळल्यानंतर त्यानं शरण येणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता नितीन परब फरार झाला आहे.

राष्ट्रवादीच्या रोहे शहराध्यक्षपदी असलेल्या नितीन परब यानं वाळू तस्करीविरोधात कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदारांवर पिस्तुल रोखलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीनं त्याला निलंबित केल. पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या निकटचा असलेला परब अटक टाळण्यासाठी ध़डपड करतोय. त्यानं माणगावच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टानं तो फेटाळला. त्यानंतर परब यानं शरण येण  किंवा पोलिसांनी त्याला अटक करणं अपेक्षित होतं. मात्र पोलिसांना परब अजूनही सापडलेला नाही.

दिवेआगरमधील गणेशमुर्ती चोरी, दरोडेखोरांचे हल्ले या पाश्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. दरम्यान शिवसेनेनं नितीन परबला अटक न केल्यास जिल्हा बंद पुकारण्याचा इशारा दिलाय. तर पोलीस अधीक्षक आर डी शिंदे यांनी नितीन परबला शोधण्यासाठी त्याच्या घरी,मित्रांकडं आणि नातेवाईकांच्या घरी पोलीस पथकं पाठवल्याचं सांगितलयं.