कोकणचा 'आंबा' पावणार का?

आंबा खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसानं यंदा मनमुराद आंबे खाण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. वादळी पावसामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात, तर आंबेही झाडावरून गळून पडू लागलेत.

Updated: Apr 4, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com.com, सिंधुदुर्ग 

आंबा खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसानं यंदा मनमुराद आंबे खाण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. वादळी पावसामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात, तर आंबेही झाडावरून गळून पडू लागलेत.

आंबाप्रेमींना यंदा हापूससाठी चांगलंच तरसावं लागणार आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळं आंब्याचं प्रचंड नुकसान झालंय. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका देवगड हापूसला बसलाय. आंब्यासाठी यंदाच्या वर्षातलं हवामान अगदीच लहरी राहिलंय. अगोदर कडाक्याची थंडी आणि त्यानंतर कडाक्याचं ऊन यामुळं आंब्यावर काळे डाग पडलेत. त्यात आता वादळी पावसाची भर पडल्यामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात. अनेक ठिकाणी आंबेही झाडाखाली पडल्याचं चित्र आहे.

देवगडचा हापूस दरवर्षी परदेशात पाठवला जातो. मात्र काळे डाग असलेल्या आंब्याची निर्यात केली जात नाही. त्यामुळं यावर्षी हापूसची परदेशवारीदेखील अडचणीत आलीय.