जि.प. सदस्याने केला मुलीवर बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा एमएमएस तयार करण्याचा खळबळजनक प्रकार नागपूरात उघडकीस आलाय आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हि घटना घडली आहे.

Updated: Jan 5, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा एमएमएस तयार करण्याचा खळबळजनक प्रकार नागपूरात उघडकीस आलाय आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हि घटना घडली आहे. या प्रकरणातील जबाबदार असलेल्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात आरोपींपैकी एक हा स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आहे.

 

या प्रकरणात आणखीनही काही आरोंपीच्या अटकेची शक्यता आहे. २०११च्या मार्च महिन्यात पिडीत मुलीवर चार युवकानी बलात्कार करुन तीचा एमएमएस बनवला होता. या प्रकरणातील आरोपीनी पिडीत मुलीला या प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्याच आरोपीनी पिडीत मुलीला पुन्हा ३१ डिसेंबरला आपल्या सोबत येण्याची मागणी केल्यानंतर पिडीत मुलीने पालकांच्या कानावर हा प्रकार उघड करताच, या गुन्ह्याचा भंडाफोड झाला आहे.

 

[jwplayer mediaid="24258"]