जळगावचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उपोषण मागे घेतलं आहे. कापूस दरवाढीच्या मागणीसाठी गेले 10 दिवस त्यांचे उपोषण सुरु होते. उपोषण सोडले असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात चक्काजाम करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला असून जिल्ह्यातल्या रस्त्यावरुन एकही वाहन फिरकू देणार नसल्याचं ते म्हणाले. महाजनांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा सरकारी रुग्णालयात जाऊन आमदार गिरीश महाजन यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली.