विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

Updated: Apr 3, 2012, 12:09 PM IST

www.24taas.com, दीपक भातूसे, मुंबई

 

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. विधानसभेत जाण्यास विरोधकांनी स्पष्ट नकार दिला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष सदस्य बसून आहेत. जो पर्यंत बोलू दिलं जात नाहीत तोवर कामकाजावर बहिष्कारावर कायम राहण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलण्याची संधी वारंवार नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.