www.24taas.com, जळगाव
जळगाव-आसोदा रेल्वे स्टेशन दरम्यान कोळी महासंघाच्या आंदोलकांनी रेलरोको केला होता. त्यामुळं मुंबईकडे येणारी काशी एक्स्प्रेस भुसावळला थांबवण्यात आली होती. तर इतर दोन मालगाड्याही आंदोलकांनी अडवून धरल्या होत्या.
त्यामुळं मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आंदोलकांना किरकोळ दगडफेक केल्यामुळं पोलिसांनीही आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे. टोकरे कोळी जातीचं प्रमाणपत्र तातडीनं मिळावं तसंच जात पडताळणी समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश असावेत, अशा विविध मागण्यांसाठी कोळी महासंघानं हे आंदोलन केलं आहे.
पण या रोलरोको मुळे रेल्वेप्रवाशी चांगलेच खोळंबले, त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रेलरोको केल्याने आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होणार का? असा सवाल प्रवासी करीत आहेत.