नाशकात लाचखोर सहनिबंधकाला अटक

नाशिकमध्ये एका उच्चपदस्थ अधिका-याला आज अटक करण्यात आली. एस.के. शेडपुरे असं या अधिका-याचं नाव आहे. सहकार विभागातील सहनिबंधक पदावर असलेल्या या अधिका-याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे.

Updated: May 26, 2012, 06:29 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये एका उच्चपदस्थ अधिका-याला  आज अटक करण्यात आली. एस.के. शेडपुरे असं या अधिका-याचं नाव आहे. सहकार विभागातील सहनिबंधक पदावर असलेल्या या अधिका-याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केली आहे.

ऐच्छिक ठिकाणी बदली करून देण्यासाठी  शेरपुडे यांनी त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्याला ४०  हजारांची लाच मागितली होती. याबाबत कनिष्ठ कर्मचाऱ्याने शेरपुडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याप्रमाणे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शेरपुडे यांना वैद्यनगर येथील राही बंगला या राहत्या निवासस्थानी लाच घेताना अटक केली.

शेरपुडे यांना मदत करणारा त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नरेंद्र बाबूराव नागरे यांनाही अटक करण्यात आली आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेरपुडे यांच्या घराची झडती घेतली असता तब्बल ८ लाख रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.