देवकरांना पुन्हा अटक होणार?

जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

Updated: Aug 6, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com, जळगाव

जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

 

यापूर्वी २१ मे २०१२ रोजी याच प्रकरणात गुलाबराव देवकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना ताबडतोब जामीनही मंजूर झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी १९ मे रोजी २५ नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. त्यापैंकी १० आरोपींचा जामीन अर्ज गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे फेटाळण्यात आला होता. देवकरांवरही अशा स्वरुपाचे आरोप आहेत. त्यामुळे देवकरांचा जामीन रद्द व्हावा आणि त्यांनाही अटक व्हावी, अशी मागणी औरंगाबाद खंडपीठात परमलाल जाधव यांनी केली होती. या याचिकेवर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठानं देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सुरेश जैन हेही अटकेत आहेत.

 

.