निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय. इच्छुक उमेदवार ही प्रलोभन दाखवत असल्याने झोपडपट्टीतील गरीब आणि सर्वसामान्य पोस्टात सेविंग अकाऊंट उघडण्यासाठी पोस्टात गर्दी करत आहेत.
नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर अफवांचा बाजार गरम झालाय. एका अफवेमुळं नाशिकमध्ये पोस्टाची चांदी झालीये. पोस्टात खाते उघडल्यास पेन्शन आणि एकरकरमी पाच ते दहा हजार रुपये मिळतील अशी अफवा उठलीये. त्यामुळे नाशिकच्या पोस्ट ऑफीसमध्ये ही झुंबड उडाली. य़ामुळं एका महिन्यात तब्बल पाच हजार खाती उघडण्यात आली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय पक्षांनी या अफवा उठवल्याचं सांगण्यात येतंय.
खाते उघडलेले नागरिक पेन्शनची रक्कम जमा झाली आहे की नाही हे विचारण्यासाठीही पोस्टात गर्दी करतआहे. प्रसंगी पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळही करत आहेत. अफवेमुळं गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतोच आहे शिवाय मनस्तापही होतोय. एरव्ही, नव्या खातेधारकांकडं डोळे लावून बसणाऱ्या पोस्टातील अधिकाऱ्यांची अवस्था अफवेमुळं केविलवाणी झाली आहे.