'बंडखोराला भुजबळांनी रसद पुरवली'

नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवामुळं पक्षात अंतर्गत वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. समीर भुजबळ यांनीच बंडखोराला रसद पुरविल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

Updated: Feb 18, 2012, 07:11 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या पराभवामुळं पक्षात अंतर्गत वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.  समीर भुजबळ यांनीच बंडखोराला रसद पुरविल्याचा आरोप त्यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार हे नाशिक मनपा निवडणुकीत उभे होते. मनपा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिलाय.खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोराला रसद पुरवल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. समीर भुजबळ यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं शेलार .यांनी म्हटलयं. याबाबत भुजबळांना विचारलं असता त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले आहेत.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राज यांनीही टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच नाशकात गाड्या जाळण्याचा प्रकारही प्रचाराचा मुद्दा झाला होता. त्यामुळे येथे कोण बाजी मारतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आपणच किंग  असल्याचे भुजबळांनी म्हटले होते. परंतु राष्ट्रवादीच्या पराभवाला समिर भुजबळ कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. तसा आरोप

[jwplayer mediaid="50944"]