अजित पवारांचा विरोधी पदावर डोळा

पिंपरी चिंचवड महापालिकेत१२८ जागांपैकी ८३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलेल्या राष्ट्रवादीचा महापौर होणार हे निश्चित झाल्यावर आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे

Updated: Mar 10, 2012, 09:23 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पिंपरी चिंचवड महापालिकेत१२८ जागांपैकी ८३ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलेल्या राष्ट्रवादीचा महापौर होणार हे निश्चित झाल्यावर आता विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे.

 

 

वास्तविक शिवसेना भाजपचं संख्याबळ १७ वर जातंय. मात्र ९ बंडखोर उमेदवारांना काँग्रेसला पाठिंबा द्यायला लावून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडंच ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळालं तर श्रीरंग बारणे आणि सुलभा उबाळे या नेत्यांकडं जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळं पिंपरीत सत्ताधारी आपले आणि विरोधकही आपलेच हा डाव टाकण्याची दादांची खेळी कितपत यशस्वी होते, ते काही दिवसांतच स्पष्ट होईल.

 

अजित पवारांनी खाल्ली पलटी

पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदावर केलेली सुमन नेटकेंची निवड रद्द करत अजित पवारांनी राजू मिसाळ यांना संधी दिली आहे. अजित पवार यांनी अचानक पलटी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे, दादा का घाबरले?

 

महापौर, उपमहापौर आणि गटनेते या तिन्ही पदांवर महिलांची निवड झाल्यानं पुरूषांचा दबाव वाढला. या दबावाला बळी पडत अजित पवारानी अचानक निर्णय बदलला आणि महिला दिनानिमित्त दिलेली भेट परत घेतली. हा महिलांचा अपमान  असल्याची भावना महिला नगरसेवकांतून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीने महिला आरक्षणाला पाठिंबा देताना महिलांना संधी देण्याची भाषा केली होती. मात्र, आधी पदे बहाल करून ती पुन्हा काढून घेतल्याने राष्ट्रवादीची अजित पवारांच्या निर्णयामुळे गोची झाली आहे. अजित पवार कोणाच्या दबावाला बळी पडले? त्यांनी हा निर्णय बदलला नसता तर राजकारणात काय परिणाम झाला असता, याचीच चर्चा आता जोर धरू लागली आहे.

 

व्हिडिओ पाहा..

 

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी मोहिनी लांडे