आबांच्या कन्येची भरारी, त्याला विरोधाची तुतारी

सांगलीतल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात घराणेशाहीचा मुद्दा पुढं आला. युवती मेळाव्याच्या निमित्तानं झळकलेल्या पोस्टर्सवर आबांची मुलगी स्मिता हीचा फोटो होता. त्यामुळं तीचं राजकीय लॉँचिंग आहे काय अशी चर्चा सुरु होती.

Updated: Jul 3, 2012, 09:17 PM IST

www.24taas.com, सांगली

सांगलीतल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात घराणेशाहीचा मुद्दा पुढं आला. युवती मेळाव्याच्या निमित्तानं झळकलेल्या पोस्टर्सवर आबांची मुलगी स्मिता हीचा फोटो होता. त्यामुळं तीचं राजकीय लॉँचिंग आहे काय अशी चर्चा सुरु होती.

मेळाव्यात एका कार्यकर्तीनं घराणेशाहीचा मुद्दा मांडला. त्यावर चांगलं काम करणा-यांना संधी दिली जाईल अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

कोणत्याही नेत्यांच्या मुलांच्या महत्वकांक्षा सामान्य कार्यकर्त्याच्या आड येणार नाहीत असा निर्वाळा गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला. आबांनी आपली मुलगी स्मिताचा संदर्भ देत, प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याना न्याय दिला जाईल, असं आश्वासन दिलं.