निवृत्त पोलीस भाऊसाहेब आंधळकरांना अटक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुण्यात भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आली आहे. आंधळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या कारणावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

Updated: May 3, 2012, 09:04 AM IST

www.24taas.com, पुणे

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुण्यात भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आली आहे. आंधळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या कारणावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  ही कारवाई केली आहे.

आंधळकरां विरोधात चतु:शंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंधळकरांकडे सुमारे १ कोटी ५७ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा एसीबीचा दावा आहे. एसीबीकडे आंधळकरांच्या संपत्तीविरोधात तक्रारी आल्या होत्या.

त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार एप्रिल २०११ पासून एसीबीने त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरु केली होती. सतीश शेट्टी हत्येप्रकरणीही आंधळकर संशयित असून, ज्या ९ जणांची पॉलीग्राफीक टेस्ट करण्यात येणार आहे, त्यात आंधळकरांचाही समावेश आहे.