पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची 'अश्मयुगा'कडे वाटचाल

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईनं अक्षरश: पातळी सोडली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्यातली राजकीय लढाई शिवराळ पातळीवर पोहचली आहे.

Updated: Nov 6, 2011, 09:47 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईनं अक्षरश: पातळी सोडली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्यातली राजकीय लढाई शिवराळ पातळीवर पोहचली आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांचा राष्ट्रवादीच्या लक्ष्मण जगताप यांनी पराभव केल्यानंतर या दोघांमध्ये कमालीचं वैर निर्माण झालंय. आता तर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकही येऊ घातल्यानं यांच्यातल्या राजकीय संघर्षाती सीमा अतिशय खालच्या पातळीवर येऊन पोहचलीय.

 

यात पहिला वार केलाय तो आमदार लक्ष्मण जगताप यांनी. बारणे हे अकार्यक्षम आणि 'षंढ' असल्याची टीका जगताप यांनी केली.अशा टीकेवर पलटवार करणार नाहीत ते, शिवसेनेचे नेते कसले! इकडं श्रीरंग बारणेंनी जगताप यांना लक्ष्य करत त्यांना 'डायनासोर' संबोधलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय कुरघोड्यांची मालिका सुरु झाली आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत शाब्दीक आरोपांच्या या फै-या किती खालची पातळी गाठतील,  याची कल्पना न केलेलीच बरी!