पुण्यात बनावट गुटख्याचा साठा जप्त

पुणे पोलिसांनी बनावट गुटख्याचा मोठा साठा जप्त केलाय. कात्रजमधल्या राजीव गांघी उद्यानासमोर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कोल्हापूरहून हा बनावट गुटख्याचा ट्रक आल्याची माहिती आहे.

Updated: Apr 20, 2012, 07:35 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे पोलिसांनी बनावट गुटख्याचा मोठा साठा जप्त केलाय.  कात्रजमधल्या राजीव गांघी उद्यानासमोर पोलिसांनी ही कारवाई केलीय. कोल्हापूरहून हा बनावट गुटख्याचा ट्रक आल्याची माहिती आहे.

 

15 लाख रक्कमेचा गुटखा जप्त करण्यात आलाय. राज कोल्हापूरी आणि यात्री अशा नावांचा हा गुटखा आहे. ट्रक ड्रायवरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातुन हा गुटखा मुंबई, ठाणे, आणि नाशिक या शहरात पाठवला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. बनावट गुटख्याचं रॅकेट यामागे आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

पुणे पालिकेचा जकात आणि सेल्स टॅक्सही चुकवला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं ही कारवाई केली.

Tags: