महिला महापौरांना त्रास, कसा होणार विकास?

सोलापूर शहराचा विकास कसा होणार हा प्रश्न पडलाय खुद्द नवनिर्वाचीत महापौर अलका राठोड यांना. सोलापूर प्रशासनाकडून अवहेलना होत असल्याचं तसंच प्रशासन विकास कार्यात सहकार्य करत नसल्याचं महापौरांचं म्हणणं आहे.

Updated: May 9, 2012, 09:59 PM IST

www.24taas.com, सोलापूर

 

सोलापूर शहराचा विकास कसा होणार हा प्रश्न पडलाय खुद्द नवनिर्वाचित महापौर अलका राठोड यांना. सोलापूर प्रशासनाकडून अवहेलना होत असल्याचं तसंच प्रशासन विकास कार्यात सहकार्य करत नसल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. सोलापूर महापालिकेत 4 महिन्यांपूर्वी काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या सहकार्यानं पालिकेत सत्ता हस्तगत केली आहे.

 

उच्चशिक्षित असलेल्या महापौरांनी नागरिकांच्या समस्यांची माहिती घेत प्रशासनाच्या संबंधीत अधिका-यांकडून अहवाल मागवण्याचा धडाकाच लावला. त्यामुळे अडचणीत आलेले कर्मचारी आणि पालिका प्रशासनानं त्यांना सहकार्य न करण्याचं ठरविल्याचं बोललं जातंय.

 

गेल्या आठवड्यात तर कहरच झाला. शहरात स्वच्छता अभियानाची सुरूवात करण्याचं महापालिका प्रशासनानं परस्पर ठरवलं पण महापौरांना पुर्वकल्पना न देता थेट ऐनवेळी उद्धाटनासाठी आमंत्रण दिलं. याचवेळी प्रशासनाला माहिती देण्याचे आदेश महापौरांनी दिले. मात्र तरीही प्रशासनानं महापौरांना जुमानलं नाही. महापौरांना प्रशासनानं माहिती देणं  अपेक्षित आहे पण विरोधी पक्षाकडूनच त्यांना माहिती पुरवली जातेय. त्यामुळं महापौरांनीच आपले विशेष अधिकार वापरून प्रशासनातील अधिका-यांवर कारवाई करण्याचा सल्ला विरोधी पक्ष नेत्यांनी दिलाय.