सोलापूरात चोरांचा सुळसुळाट

सोलापूरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यामध्ये दहशत पसरली. भरदिवसा एखाद्याच घर फोडायला मागे पुढे पाहत नाही.

Updated: Dec 8, 2011, 06:39 PM IST

झी २४ तास वेब टीम, सोलापूर

 

सोलापूरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यामध्ये दहशत पसरली. भरदिवसा एखाद्याच घर फोडायला मागे पुढे पाहत नाही. गेल्या वर्षभरात एकट्या सोलापूरमध्ये १४३ घरफोड्या झाल्या. यामध्ये फक्त ५१ घऱफोडीचे गुन्हे उघडकीस आले. अनेक प्रकरणात काहीही निष्पन्न होत नसल्याने अनेकजण तर तक्रारही करत नाही. बऱ्याचवेळा आरोपी गजाआड होतात सुध्दा मात्र त्यांनी चोरलेल्या मुद्देमालाचा काही पत्ताही लागत नाही.

 

सोलापूरातल्या बड्या मंडळीच्या घरांवर चोरट्यांची कायमच नजर असते. दिवसा हे चोर त्या भागाची रेकी करतात. विशेष म्हणजे रेकी करण्यासाठी चोरांची टोळी खास माणसं तयार करत असते. चोरांच्या टोळ्या या अशा भागात दिवसभर फिरून रेकी करत असतात.

 

गेल्या काही दिवंसापासून सोलापूरमध्ये घरफोडी कऱणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. घरफोडी कऱणाऱ्या चोरांची यादीही पोलिसांकडे असते. चौकशीसाठी पोलीस मग अशा घरफोड्यांना आणतात. त्यांची चौकशी केली जाते. एखाद्या बड्या आसामीच्या घरी घरफोडी झाली की मग असे घरफोडी कऱणारे आरोपी तात्काळ गजाआडही केले जातात. मात्र सर्वसामान्यांच्या घरी घरफोडी करणारे हे मोकाट फिरत असतात. याचे कारण अद्याप सोलापूरकरांना सापडले नाही. पोलीस पथक स्वानपथकासह घटनास्थळी दाखल होतात. मात्र त्यांच्या हाती फारसं काही लागत नाही. कारण पोलिसांपेक्षा चोरट्यांना श्वानपथकाची अधिक माहिती असते. आणि ते त्याची योग्य ती काळजी घेत असल्याचं अनेक उदाहरणावरुन समोर आलय