स्थायी सभापतींवर अपहरणाचा आरोप !

कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आपल्या मुलाचं अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोतदार यांनी केली आहे.

Updated: Feb 4, 2012, 05:01 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आपल्या मुलाचं अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोतदार यांनी केली आहे.

बाळासाहेब पोतदार यांचा मुलगा अमोल याने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन अनेकांकडून लाखो रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाच नोकरी मिळाली नाही. त्यामुळे ते पैसे परत करावे यासाठीच कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख अमोलचं अपहरण करत खंडणी उकळल्याचा आरोप बाळासाहेब पोतदार यांनी केला आहे.

शिवाय पोतदार कुटुंबांचा मानसिक छळ करत जीवे मारण्याची धमकी  दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने कोर्टात जावं लागल्याचं त्यांनी म्हटलंय. तर अपहरण केला नसल्याचा दावा शारंगधर देशमुख यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.