www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईत प्रेक्षकांनी 'अजिंठा' या मराठी सिनेमाचा शो बंद पाडण्यात आला. एका प्रेक्षकानं स्क्रीन फाडल्यानं सिनेमाचा शो बंद करण्यात आला. वाशीतल्या रघुवीर मॉलमधील फेमी थिएटरमध्ये हा प्रकार घडला.
अजिंठा सिनेमातील काही दृश्यांवर बंजारा समाजानं आक्षेप घेतला होता. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर औरंगाबाद खंडपीठानं सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगीही दिली. मात्र असं असताना सिनेमाविरोधातला रोष कायम आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे नवी मुंबईत स्क्रीन फाडण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले.